सातारा : येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. तर पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडे असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकित त्यांनी केलं आहे.
“कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील. आपलेच असतील ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्री धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याच्या आता राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु असून राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलं आहे की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईल असं तुळजाभवानी मातेला साकडं घातलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
