Share

मेहंदीच्या कार्यक्रमात दीपक चाहर अन् जया भारद्वाजचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मधून बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आज आग्रा येथे त्याची मंगेतर जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधणार आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाचे कार्यक्रम एक दिवस आधीपासूनच धूमधडाक्यात सुरू आहेत. अलीकडेच आयपीएलमधील लिलावात सर्वात महागडा गोलंदाज म्हणून विकला गेलेला दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्याने त्याला आयपीएल २०२२ मधून बाहेर पडावे लागले. यंदाच्या हंगामात तो चेन्नई संघासाठी एकही सामना खेळू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामातील प्रत्येक सामन्यात चेन्नईला दीपक चाहरची उणीव कायम भासत राहिली. दीपकसाठी तो खूप निराशाजनक काळ होता. पण आता दीपक आपले वैवाहिक जीवनाची नवीन सुरुवात करण्याच्या तयारीत व्यस्त आहे करत आहे.

बुधवारी सकाळपासूनच दीपकच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. प्रत्येक क्रिकेट कुटुंबातील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक असलेले दीपक आणि जया दोघेही या क्षणांचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. सकाळी जेव्हा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला तेव्हा हे जोडपे मित्र परिवारासोबत भन्नाट डान्स करताना पाहायला मिळाले.

यादरम्यान दीपक ची मंगेतर जया बॉलिवूडमधील सुंदर नायिका सारखी दिसत होती. सीए नदीच्या कार्यक्रमाचा विधी सुरू होण्याअगोदर जयाने दीपक सोबत ढोलाच्या तालावर डान्स केला. हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे हे आनंदाचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर ढोलाच्या तालावर दिपक आणि जया सोबत सर्वच मित्र परिवार व नातेवाईक नाचू लागले. यावेळी वातावरण खूपच आनंदमय झाले होते. दिपकने या सोहळ्यासाठी फक्त जवळच्या कुटुंबातील मित्र आणि मैत्रिणींना आमंत्रित केले आहे. त्यानंतर तो भारतीय संघातील सहकारी खेळाडूंसाठी राजस्थान आणि त्यानंतर मुंबईत रिसेप्शन आयोजित करू शकतो, अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!