Share

गांगुलीचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याबाबत सचिव जय शहांच मोठं वक्तव्य; म्हणाले, “सौरवने अध्यक्षपदाचा…”

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने ट्विट करत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले असल्याचे वृत्त सध्या व्हायरल होत आहे. यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सौरव गांगुली अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे. सौरव गांगुलीच्या ट्विटनंतर समाज माध्यमांमध्ये गांगुली अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे अशी चर्चा पसरली होती. यामागे काही जाणकार राजकीय पार्श्वभूमी असल्याचे ही सांगत आहेत.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले आहे की सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.

महत्त्वाचं म्हणजे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतीच अमित शहा यांच्यासोबत भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर या अटकळांना पूर्णविराम मिळाला. भाजपमध्ये सामील होण्याच्या आणि अमित शहा यांच्यासोबत डिनरमध्ये सहभागी होण्याच्या अटकेवर गांगुली म्हणाले की, मी अमित शहा यांना २००८ पासून ओळखतो. खेळतानाही मी त्यांना भेटायचो. यापेक्षा जास्त काही नाही. मात्र या अगोदरच्या घटना पाहता अनेक जणांचे म्हणणे आहे की सौरभ गांगुली अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नक्कीच राजकारणात पाहायला मिळेल. गांगुलीने ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्विकारले होते. त्यानंतर त्याचा तीन वर्षाचा कारभाराचा कालावधी यावर्षी सप्टेंबरमध्ये संपत आहे.

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर भारतीय संघात बऱ्याच घडामोडी घडल्या २०१७ पासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने २०२१चा टी२० विश्वचषक झाल्यावर संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला. त्याच्या एक महिन्यानंतरच त्याने वन-डे संघाचे तर जानेवारी २०२२मध्ये कसोटी कर्णधारपदावरूनही तो पायउतार झाला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे तीनही प्रकारातील कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!