Share

अभिनेत्री हेमांगी कवी भावुक; केकेसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते परत हॉटेलवर गेले तसे ते कोसळले. त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केकेला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले कि, मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! शाळा संपून college मधल्या नवनवीन हवेत ”यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90s मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!

https://www.instagram.com/p/CeQBUHPJXJD/

केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!