Share

‘औरंगाबाद नाही संभाजीनगरच’ ; शिवसेनेकडून सभेपूर्वी ट्रेलर लाँच!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ८ जूनला औरंगाबाद येथे सभा घेत आहेत. आता याच औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेने नवा टीझर लाँच केला आहे. हा टीझर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील विधानाचा आहे. या टीझरमध्ये \’औरंगाबाद नाही, संभाजी नगर मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय,’ अस वाक्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात आहे.

शिवसेनेच्या मुंबईतील सभेनंतर औरंगाबादच्या नावावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरे तू कोण संभाजीनगर म्हणणारा ? महात्मा गांधी की सरदार वल्लभभाई पटेल? अशा एकेरी भाषेत मुख्यमंत्र्यांवर केली होती. महाविकास सरकार तुमचेच आहे, तर तुम्ही आतापर्यत औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवायला पाहिजे होते, अशा टीका विरोधकांनी शिवसेनेवर वारंवार केली जात होती. यावर आता ८ जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहेत.

८ जूनला होणाऱ्या सभेचा टीझर शिवसेनेने बाळासाहेबांच्या आवाजात आज लाँच केला आहे. औरंगाबाद येथे शिवसेना शाखेचा ३७ वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. काही दिवसापूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये पाण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर मनसेने सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर आणि औरंगाबाद नामांतर मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय म्हणतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!