Share

…तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना लाथ मारुन मंत्री पदावरुन हटवावे – करुणा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा मुंडेनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच माझ्याकडे एक सीडी आहे आणि आपण जर सीडी काढली तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल, असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही आवाहन केले आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे आणि माझ्या बहीनीचे शारीरीत सबंध होते, हे जेव्हा मला कळाले तेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. हे सर्व प्रकरण जेव्हा माझ्या आईने देखील धनंजय मुंडेंच्या दबावाखाली आत्महत्या केली. धनंजय मुंडेनी माझ्या भावाला देखील मानसिक त्रास दिला. धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा सर्वात जास्त दुरुपयोग करत आहेत. या राज्यात शक्ति कायदा असेल तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना लाथ मारुन मंत्री पदावरुन हटवले पाहिजे.”

“धनंजय मुंडे ४ महिलांवर अत्याचार करत आहेत. माझी बहीण रेणू शर्मा प्रकरणाव्दारे सेक्स रॅकेट प्रकरणातील मुलींना धनंजय मुंडे घाबरवत आहे. त्यांच्यावर दबाव निर्माण करत आहे. नवऱ्याच्या नावाचे मी पाणी आणि पिंडदान सोडले. असा अय्याश आणि औरतबाज नवरा मला नको. आपल्या सेक्सच्या जाळ्यात अडकवून धनंजय मुंडेनी माझ्या बहिणीला ४० वर्षाचे केले. कोणत्या तोंडाने हे शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील,” असे करुणा मुंडे म्हणल्या.

करुणा मुंडे म्हणल्या, “सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हात तोडू, माझी बहिण आठ ते नऊ महिन्यांपासून त्यांना मेसेज करत आहे. पण कोणताही प्रतिसाद येत नाही आहे. त्यांना विनंती त्यांनी धनंजय मुंडेना मंत्रीपदावरुन हटवावे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!