Share

“धनंजय मुंडेचे अनेक महिलांशी अनैतिक सबंध” ; करूणा मुंडेचे खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. आज करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा मुंडे पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच माझ्याकडे एक सीडी आहे आणि आपण जर सीडी काढली तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल, असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

आपली मुलगी शिवानी धनंजय मुंडे हीच पत्रकार परिषद घेणार होती, मात्र ती अनुपस्थित असल्याने आपण पत्रकार परिषद घेत आहोत असं त्यांनी सांगितलं. शिवानी ही धनंजय मुंडेंच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट कऱणार होती, पण आपल्या मुलीला धमकावण्यात आल्याने ती पत्रकार परिषदेला गैरहजर राहिल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. मुंडेंच्या सांगण्यावरुन मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं, पण त्यांनी माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज केले. त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असंही करुणा मुंडेनी सांगितलं आहे.

धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई झाली, धनंजय मुंडेंमुळे माझ्या आईने आत्महत्या केली. करुणा  म्हणाल्या,”मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही मी आज पर्यंत त्यांची इज्जत करत होते. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझ्या आईंची मुंडेंनी हत्या केली आहे. पवारांनी मुंडेंना मंत्री पदावरून हकललं पाहिजे. मुंडेंनी मंत्री पदाचा गैरवापर केला. माझ्यापासून दोन मुलांना जन्म देऊन त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडलं.

आपण या प्रकरणी सुप्रिया सुळेंकडेही अनेकदा न्यायासाठी विनंती केली, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून हकलण्याची मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा मुंडे यांनी सांगितलं.

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, “धनंजय मुंडे दहा नंबरहून का बोलतात? एका वेश्याचेही दहा नंबर नसतात मग मुंडे नेमके बोलतात कुणाशी? मी खंडणी मागते असे धनंजय मुंडे आरोप करतात मी ५ कोटीच्या घरात राहते त्या अडीच कोटीचे कर्ज माझ्यावर आहे. तसंच माझा सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतलं आहे .मी माझा खात्यावरून धनंजय मुंडेंना १ कोटी रुपये दिले आहेत. वेळोवेळी मी मुंडेंच्या सांगण्यावरून त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले आहेत. मी सध्या सोनं विकून घर चालवत आहे. मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल.”

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!