🕒 1 min read
जळगाव : संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची खेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची होती, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी केला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत शाहू छत्रपतींच्या भेटीसाठी थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर गेले होते. भाजपच्या या खेळीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. यावरून आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
भारतीय जनता पार्टीने राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. माजी मंत्री डॉ अनिल बोंडे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यानंतर कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्या रुपात तिसरा उमेदवार भाजपने दिला आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाराष्ट्रातून 6 जागांसाठी 7 उमेदवार झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना-भाजप आमनेसामने आले असताना पाहायला मिळत आहे.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, “आमच्या राज्यसभेच्या तीनही जागा निवडून येतील. दोन जागा आजच आमच्या निवडून आल्या आहेत, तिसऱ्या जागेसाठी आमची लढत सुरू आहे. मी दाव्याने सांगतो की भाजपच्या राज्यसभेच्या तिन्ही जागा निवडून येतील, तिन्ही उमेदवार आमचे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून येतील. यात तिळमात्र शंका नाही, घोडेबाजार यामध्ये नाही. जर घोडेबाजार होत असेल तर शिवसेनेने दुसरा उमेदवार मागे घ्यावा. घोडेबाजार तुमच्या कडूनच होणार आहे आम्हाला घोडेबाजाराची आवश्यकता नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. मतदान झाल्यावर आणि निकाल लागल्यावर आपल्याला कळेलच”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
