🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनडीपीस न्यायालयाकडून शुक्रवारी क्रूजड्रग्ज प्रकरणी क्लीनचीट मिळाली. आर्यन खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. यानंतर आता या प्रकरणात ज्यांनी कारवाई केली, मुंबई एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून समीर वानखेडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वानखेडे यांना नोकरीवरून बडतर्फ ही केले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता समीर वानखेडे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी आपण नकारात्मकडे लक्ष देत नाही तर सकारात्मकतेने काम करतो, असं म्हटलं आहे.
“मी कधीही नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देत नाही. कारण जर तुम्ही या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत बसलात तर प्रगती होणार नाही. मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सकारात्मक बाजू पाहातो. ज्यामुळे मी कायम सकारात्मक राहतो.” असं समीर वानखेडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I don't harp on the negative because if you do, then there's no progression. There's no froward movement. You got to always look on the bright side of things, and we are in control. Like, you have control over the choices you make. ????#SameerWakhende
— Sameer Wankhede (@swankhede_IRS) May 30, 2022
आर्यन खान ड्रग्जप्रकरणात आर्यनची निर्दोष मुक्तता झाल्यावर, यात तत्कालीन तपास अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची आता नोकरी जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. वानखेडे यांना पदावरुन हटवण्यात येण्याची शक्यता असल्याचं, केंद्र सराकारमधील सूत्रांनी सांगितलं आहे. आता पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल. या चौकशीत वानखेडे यांनी अपेक्षित सहकार्य केले नाही आणि या प्रकरणी समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
