🕒 1 min read
मुंबई: रुग्णालयातील नवनीत राणांच्या फोटोसेशनवरून शिवसेनेने आक्षेप घेतला होता. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली होती. यावेळी MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूंना घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले? हा मुख्य आक्षेप त्यांनी घेतला होता. या पाश्वर्भूमीवर आता किरीट सोमय्यांनी काही सवाल उपस्थितीत केले आहेत.
नवनीत राणा हॉस्पिटल फोटोवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते
मंत्रालयातील माहिती अधिकारा खाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना गैरकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार ? @BJP4Maharashtra pic.twitter.com/1nGydTvnaz— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 10, 2022
सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नवनीत राणांच्या हॉस्पिटलमधील फोटोंवर गदारोळ करणाऱ्या माफिया सेनेचे नेते मंत्रालयातील माहिती अधिकाराखाली फाईलचे निरीक्षण करायला मी गेलो असताना बेकायदेशीररित्या माझे फोटो काढून व्हायरल करणाऱ्या प्रताप सरनाईक वर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केव्हा कारवाई करणार?
असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मंत्रालयात फोटो काढणे मनाई आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर राज्याचे गृहमंत्री कारवाई कधी करणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
