Share

भिडे गुरूजींना मोठा धक्का, पदावरून हटवण्याची चर्चा!

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्म्याच्या दुनियेत एक गोंधळ संपत नाही, तोपर्यंत लगेच नवीन काहीतरी सुरु होतं. लिंबू प्रकरण आत्ताच सुटले नव्हते तोपर्यंत जेठालाल सोसायटीचे सेक्रेटरी होण्याच्या तयारीत आहेत. या गोष्टीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गोकुळधाम सोसायटीच्या नावाने पाणीपुरवठा खंडित करण्याची पालिकेची नोटीस आली आहे. ही माहिती जेठालाल ला मिळाली आहे. ही नोटीस वेळेत न मिळाल्यास गोंधळ होऊ शकतो. पाणीपुरवठा खंडित झाला तर सोसायटीमध्ये पाण्याच्या प्रश्नांना सर्वांना सामोरे जावे लागेल.

अशा वेळी जेठालाल यांना ही माहिती मिळाल्यामुळे ते स्वत सोसायटीचे सेक्रेटरी होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गुरुजी आत्माराम भिडेकडे असलेले गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी पद जाऊ शकते.

होणार मोठा गोंधळ ?

एकीकडे पाणीपुरवठा खंडित होण्याची नोटीस येताच, त्याचवेळी गोकुळधाम सोसायटीचे सर्व सदस्य एकत्र मॉल फिरायला जाणार आहेत. त्यामुळे आत्ता जिथे हे सर्वजन पोहचतील तिथे गोंधळच होणार आहे. या संकटाला सोसायटीवाले कसे सामोरे जातील ही बाब पाहणे मजेशीर ठरेल.

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पोस्टमन जेठालालला नोटीस देणार का ? कारण ही नोटीस फक्त सोसायटीच्या सेक्रेटरी ला दिली जाते. नोटीस मिळवण्याच्या वेळी गोंधळ माजणार आहे. हे येणाऱ्या एपिसोड मध्ये समजेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!