Share

राणा दाम्पत्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयाचे ताशेरे!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला जामीन देताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं म्हंटलं आहे. १२४ अ राजद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे असं सत्र न्यायालयाने राणा यांना जामीन अर्जावर सुनावणी देताना म्हटलंय. नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याला १२ दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयाचे ताशेरे!

राज्य सरकार हे आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबई पोलिसांकडून या आधीही विरोधी पक्षाकडून आरोप करण्यात येत होता. पोलिसांचा वापर राज्यसरकारकडून करण्यात येतो, असा आरोप वारंवार करण्यात येत होता. आता राजद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे, असं न्यायालयाने म्हंटल्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यावर वरच्या कोर्टात किंवा केंद्र सरकारकडे तक्रार करतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. तिथे त्या दिल्लीतल्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. आता समोर आलेल्या माहितीनुसार राणा यांच्या दिल्ली भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!