Share

OBC reservation : “…करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळो”, चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: हायकोर्टाने OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. यावरूनच भाजपने ठाकरे सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तर यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष (chandrakant patil) चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

“आरक्षणाचे जनक मानल्या जाणाऱ्या शाहू महाराजांची आज स्मृतिशताब्दी. त्यांना नमन करण्यासाठी मविआचे अनेक मंत्री आज कोल्हापुरात येताहेत. OBC,मराठा आरक्षण घालवण्याचं पाप मविआ सरकारनं केलंय. ते परत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळो,हीच प्रार्थना!”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयामुळे OBC आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. राज्यात साधारण १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या २०२० च्या प्रभागरचनेनुसार घेण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!