मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत राज्य सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. यावरच काल (५ मे) पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) अल्टीमेटम शब्द बोलताना अडखळले. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कालच्या पत्रकार परिषदेमध्ये इंग्रजीचा एक शब्द ‘अल्टिमेटम’ बोलू शकले नाहीत. अल्टीटम, उलटीटम करत करत अल्टिमेट बोलून टाकलं. इंग्रजी न येणं हे काय चुकीचं नाही पण दुसऱ्याने चूक केल्यावर टिंगल उडवणारी व्यक्ती म्हणजे अजित पवार, म्हणून सांगणं गरजेचं होतं.”, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कालच्या पत्रकार परिषदेमध्ये इंग्रजीचा एक शब्द 'अल्टिमेटम' बोलू शकले नाहीत. अल्टीटम, उलटीटम करत करत अल्टिमेट बोलून टाकलं. इंग्रजी न येणं हे काय चुकीचं नाही पण दुसऱ्याने चूक केल्यावर टिंगल उडवणारी व्यक्ती म्हणजे अजित पवार, म्हणून सांगणं गरजेचं होतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 6, 2022
काय म्हणाले होते अजित पवार?
“अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही, अशी हुकुमशाही चालणार नाही. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या. कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत.” असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. तसेच अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. कायद्याने हे सरकार चालते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “मामू, आणखी काही बोलायला हवे का?”, ‘त्या’ प्रकरणी पुरावा देत मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
- “…याबद्दल राज्यातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष खूश झाला”, संजय राऊतांचा खोचक टोला
- “बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून भाजपने OBC…”, संजय राऊतांचा टोला
- “नुसत्या तोंडपाटीलक्या नकोत, करून दाखवा!”, संजय राऊतांचे भाजपला आव्हान
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर-पॉवेलनं मारलं मैदान..! सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक!

