Share

हनुमान चालीसा वाचणं गुन्हा आहे का ? भोंगा वादात गुणरत्न सदावर्तेंची एंट्री

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिले आहे. मनसेच्या नेत्यांची धरपकड होत आहे. मनसेच्या अनेक नेत्यांना पोलिसांकडून नोटीस येत आहेत. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अशा स्थितीत आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. या वादावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “राज्य सरकार भोंग्यांचा आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे.” गुणरत्न सदावर्ते हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते. कोर्टाच्या आदेशानुसार आपण इथे आलो आहोत, असे सदावर्ते म्हणाले. राज्य घटनेने सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. अशा वेळी कोणी हनुमान चालीसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा ? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकांमुळे सदावर्ते यांच्यावर राज्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. नुकतेच ते पोलीस कोठडीतून जामीन मिळवून बाहेर आले आहेत. आता भोंगा आणि हनुमान चालिसा या वादातही त्यांनी उडी घेतली आहे. भोंग्यांच्या आंदोलनाबाबत भाष्य करून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!