मुंबई : “राज्यातील आणि देशातील तमाम हिंदूंसाठी आजचा काळा दिवस आहे. भोंग्यांचा विषय पुढे आल्यामुळे शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणच्या मंदिरातील सकाळच्या काकड आरत्या लाऊड स्पीकरविना पार पडल्या. भाविकांना आनंद घेता आला नाही. मंदिरांवर भोंगे लागले नाहीत. त्यामुळे देवस्थानाच्या ठिकाणी उपस्थित लाखो भाविकांची गैरसोय झाली”, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक देवस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जात होती. पण आज भोंग्याचं निमित्त करून भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदूंचा गळा घोटला आहे, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगेविरोधी भूमिकेवर सडकून टीका केली. “मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपने महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय, मग ते कोणतेही भोंगे असोत तो निर्णय २००५ चा आहे. भाजपने मनसे सारख्या पक्षाला समोर करून हा विषय चर्चेत आणला. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून मी पाहतोय, अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थस्थळं जसे की शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणी सकाळच्या काकड आरत्या लाऊडस्पीकरविना झाल्या. सकाळी मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो. म्हणून या काकड आरतीसाठी पंचक्रोशीतील लोक त्याचा आनंद घेण्यासाठी जागे असतात, आसपास उभे असतात. आज भोंग्यांचा विषय पुढे आल्यामुळे या संपूर्ण देवस्थानावर भोंगे लागले नाही आणि लाखो भाविकांची गैरसोय झाली, त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

