Share

IPL 2022 RCB vs CSK : तुमचा सपोर्ट धोनीला का विराटला? वाचा हेड-टू-हेड आकडेवारीत कोण आहे सरस!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज एक मोठा सामना होणार आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) आमनेसामने असतील. आयपीएलच्या चालू मोसमातील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून हा सामना खेळला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हंगाम संमिश्र राहिला असून त्यांनी त्यांच्या १० सामन्यांपैकी केवळ पाच सामने जिंकले आहेत. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या कामगिरीवर आज सर्वांच्या नजरा असतील. जोश हेझलवूड, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांच्या रूपाने गोलंदाजीत चांगले आक्रमण आहे.

चेन्नई सुपर किंग्जने गेल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे जबरदस्त लयीत दिसले. या सामन्यातही सर्वांच्या नजरा या दोघांवर असतील. मधल्या फळीत अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीही फॉर्मात आहेत.

हेड-टू-हेड आकडेवारीत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सीएसकेचा वरचष्मा आहे. चेन्नई सुपर किंग्जने १९ सामने जिंकले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 9 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने चेन्नईविरुद्ध बंगळुरूकडून सर्वाधिक ९४९ धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनीने आरसीबीविरुद्ध सर्वाधिक ७३७ धावा केल्या आहेत. सीएसकेविरुद्ध सध्याच्या गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने आरसीबीकडून ९ बळी घेतले आहेत. तर ड्वेन ब्राव्होने बंगळुरूविरुद्ध चेन्नईकडून १७ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!