Share

मोठी बातमी..! वृद्धिमान साहाला धमकावल्याप्रकरणी पत्रकार बोरिया मजूमदार यांच्यावर BCCIची कारवाई; दिली ‘ही’ शिक्षा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज बुधवारी क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांच्यावर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घातली आहे. बीसीसीआयच्या समितीने बोरिया यांना मुलाखतीदरम्यान साहा यांना धमकावल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या बंदीचा अर्थ असा आहे, की पुढील दोन वर्षे मजूमदार बीसीसीआय किंवा बीसीसीआयशी संलग्न असलेल्या कोणत्याही राज्य मंडळाच्या स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाहीत किंवा त्यांना बोर्डाकडून मीडिया मान्यताही दिली जाणार नाही. तसेच, बोर्डाने नोंदणी केलेल्या कोणत्याही खेळाडूची मुलाखत त्यांना मिळणार नाही.

यावर्षी १९ फेब्रुवारीला हे प्रकरण समोर आले होते. सध्या आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणारा यष्टीक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने ट्वीट केले होते. यात साहाने मजूमदार यांच्यासोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले. “भारतीय क्रिकेटमधील माझ्या सर्व योगदानानंतर…एका सन्माननीय पत्रकाराकडून हे होत आहे! कुठे गेली पत्रकारिता?”, अशी खंत साहाने ट्वीटद्वारे व्यक्त केली होती. मेसेजमध्ये साहाला सांगण्यात आले,“तुम्ही फोन केला नाही. मी यापुढे तुमची मुलाखत घेणार नाही. मी अपमान सहजासहजी घेत नाही. आणि मी हे लक्षात ठेवीन.”

हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर बीसीसीआयने साहाशी संपर्क साधला आणि अधिकृत तक्रार दाखल केली. साहाच्या ‘ट्वीट’नंतर समाजमाध्यमांवर त्याला अनेकांनी सहानुभूतीदर्शक पाठिंबा दिला. त्यानंतर बोर्डाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली, ज्यामध्ये उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि सर्वोच्च परिषद सदस्य प्रबतेज सिंग भाटिया यांचा समावेश होता. समितीने बुधवारी दिलेल्या निर्णयात मजुमदार यांना भारतीय क्रिकेटपटूला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरवले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!