🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी राणा दांपत्याला अटक केली. हनुमान चालीसा पठन करण्याच्या पाश्वर्भूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला आहे.
“राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलावं, बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. तसेच हनुमान चालीसा पठण करायची असेल तर, मंदिरात जाऊन करा. म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल. मात्र कुणाच्या घरासमोर चालीसा म्हणाल तर संकट आल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला. म्हणाले, राज ठाकरे यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा, जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा. राज्य सरकारला काही सूचना करायच्या असतील तर कराव्या. मात्र जातीय तेढ, द्वेष वाढवू नका.”
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
