Share

“राज ठाकरे हे परिवर्तनवादी भोंगा” ; भास्कर जाधवांचा टोला

Published On: 

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकार मधील नेते यांच्यात वारंवार वादविवाद होत आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप केले होते. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण केलं, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला होता. तेव्हापासून महाविकासआघाडी सरकार मधील नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाद प्रतिवाद होत आहेत. आता शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“राज ठाकरे हे एक परिवर्तनवादी नेते आहेत. मी हिंदुहृदयसम्राट आहे अशा तोऱ्यामध्ये ते भाषण करत आहेत, त्यामुळे ते परिवर्तनवादी भोंगा आहेत. या परिवर्तनवादी भोंग्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. योगींना राज ठाकरे यांनी गंजा असे संबोधले होते. त्यामुळे योगींच्या टकल्यावर शाई लावायला राज ठाकरे अयोध्येत चालले आहेत का ? असा खोचक सवाल ही भास्कर जाधव यांनी केला.

मुख्यमंत्री योगींनी हनुमान हा मागासवर्गीय आहे आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे असे म्हटले होते. आज राज ठाकरे कुठल्या तोंडाने जाऊन मोदींचे कौतुक करणार आहेत. त्यांचा नाईलाज असल्याने ते भाजपच्या बाजूने भोंगा वाजवत आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!