Share

IPL 2022 DC vs LSG : दिल्लीला बदला घेण्याची संधी; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची हेड-टू-हेड आकडेवारी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज दोन सामने होणार आहे. त्यापैकी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीनपासून खेळवण्यात येईल. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ८ सामन्यांत चार विजय नोंदवले आहेत आणि ते सहाव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सने ९ पैकी ६ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसर्‍या स्थानावर आहे. लखनऊच्या संघाला हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघालाही हा सामना आपल्या नावावर करायचा आहे. त्यांना गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील रोमांचक सामना पाहायला मिळेल.

आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकच सामना झाला आहे, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सने सहा गडी राखून विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या सामन्यात पृथ्वी शॉने दिल्लीसाठी सर्वाधिक ६१ धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्ससाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने ८० धावांची शानदार खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने लखनऊविरुद्धच्या सामन्यात २ विकेट घेतल्या. लखनऊ सुपर जायंट्ससाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटच्या सामन्यात फिरकीपटू रवी बिश्नोईने २२ धावांत २ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!