औरंगाबाद: आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. मशिदीवरील भोंग्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे न काढल्यास मंदिरात लाऊडस्पीकरून हनुमान चालीसा लावू अशी घोषणा केली होती. या पाश्वर्भूमीवर राजू शेट्टी वाशिम येथे शेतकरी मेळाव्यात बोलत असताना म्हणाले, “सध्या राज्यभरात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग सुरू असताना भोंगे काढले काय आणि लावले काय आमचे प्रश्न सुटणार आहेत का? तुम्हाला मशीद आणि मंदिरावरील भोंगे लावायचे तेव्हा लावा काढायचे तेव्हा काढा. आमचे प्रश्न मात्र सोडवा. आमचे झाडावर गळफास घेतलेल्या शेतकऱ्यांचे प्रेत खाली उतरवा, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असा काही कार्यक्रम राबवा, असे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना मी विनंती करतो”.
मशिदीवरील भोंगे उतरवले जाणार नाही –
बदनापूर तालुक्यातील ढासला येथील गावकऱ्यांनी सामाजिक सलोखा राखत ग्रामसभेत मंदिरातील घंटानाद आणि मशिदीवरील भोंगा उतरवले जाणार नाही हा निर्णय घेतला आहे. मशिदीवरील भोंग्याचा आम्हा गावकऱ्यांना कुठलाच त्रास नाही. कुणी काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या गावातील मशिदीवरील भोंगा काढणार नाही. जातीयवादाला थारा देणार नाही अशी भूमिका जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील ढासला गावाच्या ग्रामसभेत घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –


