🕒 1 min read
सोलापूर : सोलापूरमध्ये आज (३० एप्रिल) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि त्यांच्या विचारसरणीवर बोलताना त्यांचा ३० वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला.
आज राज्यातले काही पक्ष आणि त्यांचे नेते वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. “पण पवारसाहेबांनी नेहमी एकोप्याची, सामाजिक शांतता जपण्याची भूमिका ठेवली. त्यांची विचारसरणी एवढी पक्की आहे, की ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं, त्यावेळी अनेकांनी विरोध केला. पण पवारसाहेबांनी सांगितलं की सत्ता गेली तरी बेहत्तर पण माझ्या भूमिकेपासून मी मागे हटणार नाही”.
पुढे बोलताना अजित पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रसंग सविस्तर सांगितला. म्हणाले, १९९० ते १९९५ दरम्यान मी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आर.आर.पाटील यांची पहिली टर्म होती. त्यावेळी मराठवाडा विद्यापाठीच्या नामविस्ताराचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यावेळी पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होतं. त्यावेळी अनेक आमदारांनी डॉ. आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला विरोध केलं. पण आमदारांच्या विरोधाला न जुमानता पवारसाहेबांनी सांगितलं, सत्ता गेली तरी बेहत्तर पण मी बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच. सत्तेसाठी पवारसाहेबांनी कधीच चुकीची तडजोड केली नाही. वंचित गोरगरिब, दलित यांच्या कल्याणासाठी पवार नेहमी प्रयत्नशील राहिले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
