🕒 1 min read
मुंबई : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. राणा दाम्पत्याला अटक आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्लाप्रकरण यावरून राज्यातील राजकारण आणखीनच गढूळ झाले आहे. यातच आता आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा २०१७ मधील एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत, आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
नितेश राणे यांनी आता अब्दुल सत्तार यांच्या अटकेची मागणी केली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करत अब्दुल सत्तार यांनी प्रभू हनुमानाचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओ मध्ये अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतानाही दिसत आहे.
— Nitesh Rane (@NiteshNRane) April 27, 2022
नितेश राणेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर ‘शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करतात. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना…मग सत्तारांना तुरुंगात डांबून दाखवा,’ असे आव्हान दिले आहे. यावर अद्याप अब्दुल सत्तारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसून, सेनेच्या इतरही नेत्यांनी यावर मौन बाळगले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
