🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. आयपीएल २०२२मध्ये त्याने आतापर्यंत ८ सामन्यात ४९९ धावा केल्या आहेत. बटलरने ऑरेंज कॅप कायम राखली आहे. या मोसमात त्याने तीन शतके झळकावली आहेत. आगामी काळात बटलरचा फॉर्म असाच सुरू राहिला, तर तो विराट कोहलीचा आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा ९७३ धावांचा विक्रम मोडू शकतो. बटलर आयपीएलमध्ये इतका यशस्वी का होत आहे, याचा खुलासा त्यानेच केला आहे.
अलीकडेच जोस बटलरने संघसहकारी आर. अश्विनशी त्याच्या फलंदाजीबद्दल तपशीलवार चर्चा केली. तो म्हणाला, ”पाकिस्तानचे मुश्ताक अहमद मला नेहमी सांगायचे, की आधी ऑफ साइड मार. त्यानंतर लेग साइडला फटकेबाजी कर. त्याचा हाच सल्ला आयपीएलमध्ये काम करतो आहे.” मुश्ताक २००८ ते २०१४ या काळात इंग्लंडचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते. या काळात त्यांनी बटलरसोबत काम केले. क्रिकेट पाकिस्तानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुश्ताक अहमद म्हणाले, ”मी इंग्लंडसोबत ६ वर्षे काम केले. आमचे तांत्रिक काम सर्वांनाच आठवते. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत काम करता आणि त्यांना ते आठवते तेव्हा ते छान असते. मी बटलरशी गप्पा मारल्या आणि आभार मानले.”
Jos Buttler regarding Mushtaq Ahmed's advice #Cricket pic.twitter.com/ORwuP8Qd1r
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) April 26, 2022
Former Pakistan Test spinner Mushtaq Ahmed has thanked England wicketkeeper Jos Buttler for acknowledging and remembering his tips
Read more: https://t.co/JEkTNiggji#IPL2022 #CricketTwitter pic.twitter.com/m1xbMMEfH6
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) April 27, 2022
आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने १५व्या हंगामात ८ सामने खेळले आहेत, ज्यात ६ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. गुणतालिकेत १२ गुणांसह रॉयल्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सला अव्वल स्थानावर नेण्यात जोस बटलरने सर्वाधिक योगदान दिले आहे. त्याच्याशिवाय युझवेंद्र चहलने धोकादायक गोलंदाजी करताना १८ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
