Share

“…नाहीतर त्याच ठिकाणी किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. किरीट सोमय्या रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले. यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली होती. तसेच किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत देखील झाली होती.

या पाश्वर्भूमीवर भाजपानं आता राज्य सरकारवर आणि पोलीस विभागावर टीका करायला सुरुवात केली आहे. यावरूनच आता राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा दावा करत सोमय्या यांनी केला होता.

यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. किरीट सोमय्या, सरकारचे घोटाळे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. त्यामुळं सोमय्या यांना नष्ट करावं अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे. सीआयएसएफ होतं म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असंही दरेकर म्हणाले आहेत.

किरीट सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर –

या हल्ल्याबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किरीट सोमय्या यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असे वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे असे बोलले जात आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!