Share

“लोकप्रतिनिधी नावावर कलंकच..”; रुपाली पाटील नवनीत राणांवर संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली. यादरम्यान नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीची आहे म्हणून भेदभाव करणारी वागणूक दिली असा आरोप  करत त्यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते.

यावेळी राणा म्हणाल्या,  “पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितले. हा सरळसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे, मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असे ते म्हणाले,” असा थेट आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

https://fb.watch/cEVzCwR0TE/

या पाश्वर्भूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशन मधील व्हिडीओ शेअर करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “मुंबई पोलीस, असं कुठे असते का खासदार मॅडम ने पाणी मागितले आणि तुम्ही चहा पण दिला. अहो हे ढोंगी आहेत लोकप्रतिनिधी नावावर कलंकच, सत्ता पिपासू साठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे, शांतता भंग करणे हेच उद्योग. आता आळीपाळीने भाजपचे वाचाळ भोंगे समाजात तेढ निर्माण करण्याचे, समाजातील वातावरण गढूळ करणे, चेथावनी देणे, कट कारस्थान महाराष्ट्र जनता पहातच आहे. कुठे नेऊन ठेवली राजकारणाची सभ्यता,आचार,विचार, विकास?”

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!