मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा खराब फॉर्म सुरूच आहे. काल २६ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात तो पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. या सामन्यात विराटला केवळ ९ धावा करता आल्या. याआधी कोहली सलग दोन सामन्यांत गोल्डन डकवर बाद झाला होता. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो डावाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरला होता, पण त्याचे नशीब बदलले नाही. या सामन्यात त्याला प्रसिध कृष्णाने आपला शिकार बनवले. आऊट झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होते. इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये तो सतत संघर्ष करत आहे.
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या विराट कोहलीने बाद होण्यापूर्वी २ चौकार मारले. त्याने हे दोन्ही चौकार डावाच्या पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्डच्या गोलंदाजीवर मारले. यानंतर प्रसिध कृष्णा दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी विराट स्ट्राइकवर होता. या षटकात विराटला सलग ३ चेंडूत एकही धाव काढता आली नाही. चौथा चेंडू वाईड होता. कृष्णाच्या पुढच्या चेंडूवर विराटने पुल शॉट लावण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला आणि रियान परागने तो झेल टिपला.
https://twitter.com/JamesTyler_99/status/1518988032778510336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518988032778510336%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-this-was-reaction-of-virat-kohli-after-getting-out-against-rajasthan-royals-watch-video-4218269.html
यंदाच्या मोसमात विराटचा वाईट टप्पा सुरूच आहे. यंदा त्याने त्याच्या संघ आरसीबीसाठी ९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १२८ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो अनुज रावतच्या जागी डावाची सलामी देण्यासाठी आला होता. या सामन्यात विराट आणखी चांगली कामगिरी करेल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. पण तसे होऊ शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

