🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत ठाकरे सरकारला ३ मेचा अल्टिमेटम दिला असून अन्यथा राज्यभर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केले आहे.
शरद पवार १९७२ पासून सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात अनेकदा गेले आणि विकास कामांना मदत केली. मात्र, याचा बाऊ त्यांनी कधीच केला नाही. कारण ती पीढी कर्मयोगी होती. त्यांनी शाळा, महाविद्यालये, विमानतळ अशा अनेक गोष्टी निर्माण करत विकसित केल्या. चार मते कमी पडली तरी चालेल, पण माझे माझ्या राज्यावर, देशावर प्रेम आहे. त्यामुळे मी धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीच करणार नाही. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
तसेच मला हनुमान चालीसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते. ज्यांना हनुमान चालीसा म्हणायची आहे त्यांचाही मी आदर करते. मात्र इतरांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणे योग्य नाही. आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूणं हाती घेतलेल्या माणसासारखी”, अमोल मिटकरींचा टोला
- …तर दादा कोंडके यांना ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता- संजय राऊत
- “नवे सोंगाडे, दादा कोंडके हवे होते!”, ‘सामना’तून भाजपवर प्रहार
- IPL 2022 RCB vs RR : पुण्यात राजस्थानचा ‘रॉयल’ खेळ; बंगळुरूला २९ धावांनी दिली मात!
- IPL 2022 RCB vs RR : रियान परागचं झुंजार अर्धशतक; राजस्थानचं बंगळुरुला १४५ धावांचं आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
