🕒 1 min read
मुंबई: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्र्वादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर टीका करत ‘अमोल मिटकरी (Amol Mitkari) हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या असून त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही.”, असे विधान केले होते. यावरच मिटकरी यांनीही खोचक शब्दात प्रतिक्रिया देत सदाभाऊंना टोला लगावला आहे.
डोंबिवली पलावा येथे आयोजित एका कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी म्हटले की, “मी शेतकरी कुटुंबातला साधा माणूस आहे. सदाभाऊ स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेतात मात्र मी त्यांच्यावर टीका करण्याइतका मोठा नाही. पण सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतूनं हाती घेतलेल्या माणसासारखी झाले आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जसा पिंजरा चित्रपटात ज्या गुरुजींनी तमाशाला विरोध केला आणि शेवटी त्यांनाच नाचावे लागलं तशी परिस्थिती सदाभाऊंची झाली आहे.”
पुढे ते म्हणाले की, आगामी काळात सदाभाऊंची भाजपच्या फडामध्ये तुणतूणं हातात घेऊन वाजवणाऱ्याची भूमिका राहील. तसेच यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यानी केलेल्या आरोपावरही प्रतिक्रिया दिली. राणा दाम्पत्य म्हणतंय की, मी दलित आहे मला चांगली वागणूक दिली नाही. मात्र हा आरोप धादांत खोटे आहे. राणा दाम्पत्याला पुढे करून मविआ सरकार आणि पोलिसांची बदनामी करण्याचं भाजपचे षडयंत्र फसले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …तर दादा कोंडके यांना ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता- संजय राऊत
- “नवे सोंगाडे, दादा कोंडके हवे होते!”, ‘सामना’तून भाजपवर प्रहार
- IPL 2022 RCB vs RR : पुण्यात राजस्थानचा ‘रॉयल’ खेळ; बंगळुरूला २९ धावांनी दिली मात!
- IPL 2022 RCB vs RR : रियान परागचं झुंजार अर्धशतक; राजस्थानचं बंगळुरुला १४५ धावांचं आव्हान!
- IPL 2022 खेळणाऱ्या धोनीच्या बायकोला ‘या’ गोष्टीचा होतोय त्रास; ट्वीट करत विचारला जाब!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
