Share

IPL 2022 RCB vs RR : रियान परागचं झुंजार अर्धशतक; राजस्थानचं बंगळुरुला १४५ धावांचं आव्हान!

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामातील (IPL 2022) ३९वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs RR) यांच्यात सामना खेळला जात आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलरसह प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रियान परागने झुंजार अर्धशतक ठोकले आणि राजस्थानने बंगळुरुला १४५ धावांचे आव्हान दिले. शेवटच्या दोन षटकात रियानने ३० धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले.

राजस्थानचा डाव

स्पर्धेत भन्नाट फॉर्मात असलेल्या जोस बटलरला आज बंगळुरुविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने बटलरला (८) सिराजकरवी झेलबाद केले. दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला (७) सिराजने पायचीत पकडले. त्यानंतर संजू सॅमसनने एक चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावा केल्या, पण इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. राजस्थानच्या रियान परागने एका बाजुने झुंज दिली. रियानने २०व्या षटकात रियानने हर्षल पटेलला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. रियानने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी केली. राजस्थानने २० षटकात ८ बाद १४४ धावा केल्या. बंगळुरूकडून सिराज, हेझलवूड आणि हसरंगाने प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिशेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!