Share

“धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊतांचा नवा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधत त्यांना शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ ट्वीट करत सर्व आरोपांचे खंडन केले. तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खुलासा करत नवीन आरोप केले.

गेल्या काही वर्षापासून भाजपचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचा असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ५८ कोटीचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे ११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच अजून अनेक प्रकरणं समोर येतील. लोकांना ब्लॅकमेल करून, ईडीच्या, तपास यंत्रणेच्या धमक्या देऊन कोणी कोठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले हे देखील लवकरच समोर येईल. अगोदर आरोप करायचे, दबाव आणायचा, ईडीच्या, सीबीआयच्या, तुरुंगात धमक्या द्यायच्या आणि मग सौदा करण्यासाठी थायलंड बँकॉकमध्ये व्यवस्था करायची. अशी अनेकांची अनेक प्रकरणं आता समोर येतील. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्हा सगळ्यांवर कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कंबरेखाली वार करायचे नाहीत असे संस्कार आहेत. सुरुवात तुम्ही केली तरी आम्ही संयम बाळगत आहोत, पण धमक्या देऊन परदेशात पैसे कोण स्विकारत होतं हे हळूहळू बाहेर येईल. आधी या प्रकरणाचा निकाल लागू द्या. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान

निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

“‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…” राष्ट्रवादीचे टीकास्त्र

संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान

अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!