🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा अनेकदा प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडतो. त्याच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियावर तो क्रिकेटबद्दल मोकळेपणाने बोलतो. आकाश चोप्राही क्रिकेटबाबत अनेक नवनवीन सूचना देत असतो. त्याने अलीकडेच अशीच एक ट्वीट केले, ज्यावर राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने मत दिले.
पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात १०८ मीटर लांब षटकार ठोकला. यानंतर आकाश चोप्राने ट्वीट करून म्हटले, की जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावरून षटकार मारतो तेव्हा त्याला सहाऐवजी आठ धावा मिळाल्या पाहिजेत.
यावर चहलने जबरदस्त उत्तर दिले. भाई, १०० मीटरपेक्षा जास्त अंतर लांब षटकार गेल्यावर आठ धावा मिळणार असतील, तर गोलंदाजाने सलग तीन निर्धाव चेंडू टाकले तर त्याला विकेट दिली गेली पाहिजे, असे चहलने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुपरफ्लॉप..! जडेजा म्हणतो, “त्याला….”
- “भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला…”; सचिन सावंतांचा राज ठाकरेंना टोला
- ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
- “…हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सल्ला
- IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवासाठी धोनी जबाबदार? सुनील गावसकरांनी काय म्हटलं ते वाचाच!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
