🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. दरम्यान, यावर आता काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की,‘देश अशा प्रश्नांनी पुढे जाणार नाही. देश पुढे जायचा असेल तर विधायक कार्य गरजेचं आहे. मग अलीकडच्या काळामध्ये मतांची पोळी भाजून घेण्यासाठी असे मुद्दे उचलून धार्मिक धुर्वीकरण करण्याचा प्रयत्न होतोय’, असे थोरात म्हणाले.
दरम्यान, ‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला…”; सचिन सावंतांचा राज ठाकरेंना टोला
- अखेरच्या क्षणापर्यंत भाजप ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील- देवेंद्र फडणवीस
- IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवासाठी धोनी जबाबदार? सुनील गावसकरांनी काय म्हटलं ते वाचाच!
- “…हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सल्ला
- ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
