🕒 1 min read
मुंबई: ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे. भाजपचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे राजकारण संपू देणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत भाजप ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील. असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांनी केला आहे.
मतांसाठी ओबीसींचा वापर करतात. ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केला. मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले.आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार हे सरकार करते आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार सामान्यांचा विचार करीत नसले तरी केंद्रातील नरेंद्र मोदीजींचे सरकार सामान्यांचा विचार करते. त्यांच्याकडून अधिकाधिक मदत प्रत्येकाला मिळते आहे. काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठित सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. विदर्भातील 5 आणि कोकणातील 3 जिल्हे पण, हे 125 कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष 400 कोटींचा भ्रष्टाचार करतो. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणार्या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. असे करणार्यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत वापरतात. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
VIDEO : ऑस्ट्रेलियाला मिळाला त्यांचा जसप्रीत बुमराह; अॅक्शन पाहून सर्वच झाले अवाक्!
नवाब मलिकांना मोठा दणका; दोन आठवड्यांनी वाढली न्यायालयीन कोठडी!
रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक पण शरद पवारांचं काय?; केशव उपाध्येंचा टोला
“…तर शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
IPL 2022 : काय वेळ आलीय..! चेन्नई-मुंबई गुणतालिकेत तळाशी; ‘हा’ संघ आहे पहिल्या स्थानी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
