Share

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो व्हायरल ; शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. यावरुन आता शिवसेना आणि मनसेमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फेसबुकवर राज ठाकरे यांचा मुस्लिम वेशातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात अंबादास दानवे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ते म्हणाले आहेत की,‘कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्या नुसार कृती करेल तो खरा लोकनेता.आज जात,धर्म,प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही. लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे. व्यवसाय बुडाले आहे, नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे.महागाई चा आगडोंब भडकला आहे.केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर ते बोलले.’

https://www.facebook.com/iambadasdanve/posts/527293195421405

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘शिवतीर्थावर झालेल्या गुडी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्या ऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी. राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्या कडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही आणि शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज सबंध महाराष्ट्राला होतेय.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!