🕒 1 min read
मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. परंतु, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आपणच जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता.’ तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर राज ठाकरेंची टीका; म्हणाले, “आमदारांना कसली घरं…”
- “…पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील”; राज ठाकरेंचा इशारा
- “…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- “आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर…”; शरद पवारांच्या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आक्रमक
- “गरज सरो अन् धनगर मरो, हे…”; पडळकरांची पवारांवर जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
