मुंबई : काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, परंतु मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल.’ तसेच जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर राज ठाकरेंची टीका; म्हणाले, “आमदारांना कसली घरं…”
- राज ठाकरेंनी केली अजित पवारांनी नक्कल, पहा VIDEO
- IPL 2022 MI vs RR : राजस्थानचा मुंबईवर हल्लाबोल; नोंदवला सलग दुसरा विजय!
- IPL 2022 : गुजरातला टक्कर देण्यास दिल्ली तय्यार! नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- “गरज सरो अन् धनगर मरो, हे…”; पडळकरांची पवारांवर जोरदार टीका

