Share

IPL 2022 GT vs DC : मुस्तफिजूरनं रोखली गुजरातची गाडी; दिल्लीला १७२ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या (८४) अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिला सामना आपल्या नावावर केला आहे.

गुजरातचा डाव

मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातसाठी सलामी दिली. मागच्या सामन्यात खातेही उघडता न आलेल्या शुबमनने या सामन्यात दमदार फंलदाजी केली. वेडला (१) मात्र मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने वेडला यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या विजय शंकरलाही (१३) जास्त काही करता आले नाही. कुलदीप यादवने त्याला तंबूत धाडले. गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने शुबमनला साथ दिली. या दोघांनी संघाला शतकी पल्ला गाठून दिला. हार्दिकने ४ चौकारांसह ३१ धावा केल्या. खलील अहमदने त्याला बाद केले. शतकाकडे कूच करणारा शुबमन १८व्या षटकात माघारी परतला त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या. मुस्तफिजूरने शेवटच्या षटकात जास्त धावा न देता गुजरातच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्याने ४ षटकात २३ धावा देत ३ बळी घेतले. गुजरातने २० षटकात ६ बाद १७१ धावा केल्या. खलीलला २ बळी मिळाले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (w/c), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, मॅथ्यू वेड (w), विजय शंकर, हार्दिक पंड्या (c), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर सदारंगनी, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!