मुंबई : २४ मार्च रोजी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. असे असतांनाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील यामुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
काल (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत, पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय?’ तसेच सध्याची परिस्थिती बघितली तर कोणत्या आमदाराने घर मागितले होते ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला?’, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मला वाटतं आपण देवाण-घेवाण करावी. आमदारांना घर द्यावी आणि त्यांचे फार्महाऊस ताब्यात घ्यावं. मग आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे.’ तसेच अनेक प्रामाणिक लोक झोपडपट्ट्यांत राहतात, त्यांना घरे मिळाली पाहिजेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 GT vs DC : मुस्तफिजूरनं रोखली गुजरातची गाडी; दिल्लीला १७२ धावांचं आव्हान!
- राज ठाकरेंनी केली अजित पवारांनी नक्कल, पहा VIDEO
- IPL 2022 MI vs RR : राजस्थानचा मुंबईवर हल्लाबोल; नोंदवला सलग दुसरा विजय!
- IPL 2022 : गुजरातला टक्कर देण्यास दिल्ली तय्यार! नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- “गरज सरो अन् धनगर मरो, हे…”; पडळकरांची पवारांवर जोरदार टीका

