🕒 1 min read
मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी मुंबई सारख्या मायानगरीत स्वताच घर खरेदी केल आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत या दोघांनी चाहत्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली. ‘नवी सुरुवात, मुंबईत नवीन घर, मुंबईतील पहिलं हक्काचं घर’, असं कॅप्शन देत दोघांनी फोटो पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/p/Cbb3lNFPm9_/?utm_source=ig_web_copy_link
या घराचं रेजिस्ट्रेशन दोघांनी केलं असून त्यानंतरच त्यांनी हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या अंगठ्यावर शाई पहायला मिळतेय. सिद्धार्थ-मितालीने ही आनंदाची बातमी सांगताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इंडस्ट्रीतील या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि मितालीचं हे नवीन घर मुंबईत नेमकं कुठे आहे, हे अजून समजू शकलेलं नाही. त्यांनी या घराचा फोटो देखील पोस्ट केला नाही.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
