Share

“काश्मीर फाईल्स नक्की टॅक्स-फ्री करा पण पेट्रोल-डीझेल…”, रुपाली ठोंबरेंचा मोदी सरकारवर निशाणा 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने राजकीय वर्तुळातही धुमाकूळ घातला आहे. भाजपकडून महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावरच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया देत थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“काश्मीर फाईल्स नक्की टॅक्स-फ्री करा पण तेवढे डिझेल-पेट्रोलचे दर वाढले आहे. ते २५ रुपयाने कमी करण्यासाठी सरकार म्हणून करणार आहात की नाही? नाहीतर नुसतेच बजाव टाळी.”, असा टोला रुपाली पाटील ठोंबरे यांनी लगावला आहे. दरम्यान या चित्रपटावर आतापर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून मविआ नेत्यांकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान भाजपकडून मात्र या चित्रपटाचे समर्थन केले जात आहे. भाजपशासित अनेक राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. भाजपकडून हा चित्रपट म्हणजे काँग्रेसमुळे काश्मिरी पंडितांना सहन करावा लागलेला अन्याय, अत्याचार याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!