Share

IPL 2022 : ऋषभची धोनी बरोबर होणाऱ्या तुलनेवर वॉट्सनने दर्शवले मत; सांगितले दोघांमध्ये काय आहे अंतर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या सुरुवातीला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि त्याआधी ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉटसनने ऋषभ पंतची एमएस धोनीशी तुलना केल्याबद्दल मोठे विधान केले आहे. यासोबतच पंतच्या टॅलेंटचे खुलेपणाने कौतुक केले आहे.या वर्षी शेन वॉटसन पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तो दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे.

शेन वॉटसननेही (shane watson) वेळोवेळी होणाऱ्या धोनी (ms dhoni) आणि पंत (rishabh pant) यांच्या तुलनेवर आपले मत मांडले आणि त्याचे स्पष्ट खंडन केले. हे दोघेही वेगवेगळे लोक आणि क्रिकेटपटू आहेत, असे त्यांचे मत आहे. “मीडिया आणि लोक तुलना करतात . परंतु, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विशिष्ट प्रतिभा आणि क्षमता असते. ऋषभ आणि धोनी हे दोघेही भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांच्या कौशल्याचे उत्तर नाही. ऋषभही शांत आहे आणि एमएस धोनीही. मीडिया आणि लोक तुलना करत राहतील पण ऋषभला आपली छाप पाडायची आहे.”

यावर्षी माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू दिल्ली कॅपिटल्ससाठी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार आहे. याआधी त्याने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून अनेक वर्षे आयपीएल स्पर्धा खेळल्या. यासह त्याने पंतला खूप जवळून पाहिले आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि पंत यांच्या प्रतिभेवर त्याने अनुभवावरून प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!