Share

तुझ्यात जीव रंगलामधील लाडू ‘या’ कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Published On: 

मुंबई : तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता तो किचन कल्लाकार या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

किचन कल्लाकारच्या आगामी भागात लाडू सोबत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची मुलगी शौर्या वसईकर आणि गायक अभिनेत्री स्नेहलता वसईकर याची मुलगी रेणुका देशपांडे देखील सहभागी होणार आहे. ही मुले कल्लाकारच्या किचनमध्ये खूपच कल्ला करताना दिसणार आहेत. लाडू म्हणजे छोटा पहेलवान आणि त्याला सामान मिळवण्यासाठी शेठ सोबत बैठका मारण्याची स्पर्धा करावी लागली. लाडू त्या स्पर्धेत शेठला मागे टाकतो. त्याचसोबत शौर्याला देखील सामान मिळवण्यासाठी अनेक कडू, गोड, आंबट रसांचा आस्वाद घ्यावा लागला. या बच्चेकंपनीने अजून काय काय धमाल केली आणि महाराजांसाठी काय पदार्थ बनवले हे पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, किचन कल्लाकार या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींना काही भन्नाट पदार्थ तयार करायचा टास्क देतात.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!