🕒 1 min read
मुंबई : मंगळवारी ईडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत ठाण्यातील ११ फ्लॅट सील केले आहेत. त्यांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे. बनावट कंपनीच्या माध्यमातून हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याने पाटणकर यांना बिनशर्त 30 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे देखील करण्यात आला आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतीकेरिया दिली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी मिळून २०१४ मध्ये एक कंपनी स्थापन केली. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज नावाच्या या कंपनीत या दोघांचे 50-50 टक्के होते. कंपनीचे संचालक तेजस ठाकरे होते. आता त्या कंपनीचे मालक नंदकिशोर चतुर्वेदी आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी बनावट कंपनीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. हा बीएमसीच्या लुटीचा आणि वसुलीचा पैसा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मेहुण्यांमार्फत पोहोचतो का? मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः सांगावे की त्यांचे त्यांच्या मेव्हण्याशी केवळ कौटुंबिक संबंध आहेत की आर्थिक संबंध आहेत? हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी त्यांचे काय नाते आहे?, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे” असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
