🕒 1 min read
बीड : बीडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असे समीकरण पाहायला मिळत आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुस्लिम मौलानासोबत जेवण करतानाचे फोटो बॅनरवर छापले आहेत.
हे बॅनर बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर लावण्यात आले आहेत. “आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून”… ही मराठवाड्यातील म्हण या बॅनरवर छापली आहे. तसेच सत्तेसाठी आसुसलेली भाजप पिलावळ अशा आशयाचे लिखाण या बॅनरवर करण्यात आले आहे. त्यामुळे बीडमध्ये शिवसेना – भाजपात वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेच्या नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर निषाणा साधत त्यांचे काही फोटोच बॅनरवर झळकवले आहेत. मुस्लिम मौलाना यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस जेवण करतानाचे हे फोटो दर्शवून भाजप सत्तेसाठी आसुसला आहे, असा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
