🕒 1 min read
मुंबईः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीत जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. टोपे स्वतः म्हणाले कि, एमआयएम ला सोबत घ्यायचे कि नाही हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांनी आज सांगितल्यानुसार शिवसेना एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि राहणार. शिवसेना कधीही हिंदुत्वाशी या प्रकारची तडजोड करणार नाही. एमआयएमकडून आलेली फुकटची ऑफर भाजपच्या व्यापक कटाचा भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करण्यासाठी त्यांचं हे एक मोठे षडयंत्र आहे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. हा त्याच कटाचा भाग आहे. त्यानुसार त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमची बदनामी करण्यासाठी सोडले आहे. मात्र, या संदर्भात शिवसेना सावध आहे, महाराष्ट्राची जनता सावध आहे आणि शिवसेनेने हा व्यापक कट उधळून लावला आहे”. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे राऊत असंही म्हणाले कि, जर आमचे राजकीय विरोधक आमच्या हिंदुत्वावर संभ्रम निर्माण करत असतील, तर ते आम्ही सहन करणार नाही. कालपासून जी ऑफर फिरत आहे, त्याचे सूत्रधार भाजपच आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
