मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत” तसेच आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करतात याबाबत वक्तव्य केले. राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं “शिवसंपर्क अभियान” सुरू केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेनेचा नवा मित्र AIMIM पक्ष”, निलेश राणेंचा टोला
- बियाणांच्या पाकिटाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- “काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले”, संजय राऊतांचा मोठा दावा
- “हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन…”, राऊतांचा भाजपला टोला
- “माझं शहाण बाळ…” जुईली जोगळेकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

