🕒 1 min read
मुंबई: आज आमिर खानचा ५७ वा वाढदिवस आहे. आमिर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. पहिली पत्नी रीना दत्तासोबत आमिरने घटस्फोट घेतला आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याने किरण रावशी लग्न केले. तर काही महिन्यांपूर्वी आमिर आणि किरण राव यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरचे फातिमा सना शेखशी अफेअरच्या चर्चा रंगल्या. या प्रश्नांची उत्तरे आता स्वतः आमिरने दिली आहेत.
जुलै २०२१मध्ये आमिर आणि किरण लग्नाच्या १५ वर्षांनी विभक्त झाले. या दोघांनी एक पोस्ट शेअर करत हि माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली. आम्हाला आयुष्याचा एक नवा अध्याय सुरु करायचा आहे, विभक्त झाल्यावरही आम्ही एका कुटुंबासारखे एकत्र राहू, असे या पोस्टमध्ये लिहले होते. त्यानंतर आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. दंगल चित्रपटापासूनच दोघांमध्ये काहीतरी असल्याचं बोललं जात होत. फातिमामुळे आमिरने किरणला घटस्फोट दिला आणि लवकरच आमिर फातिमाशी तिसरे लग्न करणार आहे, असेही बोलले गेले. पण आमिरने हि अफवा फेटाळून लावली. तो म्हणाला कि, “नाही, माझ्या आयुष्यात तेव्हाही कोणती व्यक्ती नव्हती आणि आजही नाही.”
या अफवांवर फातिमाने पण स्पष्टीकरण दिले होते कि, “असे काही नाही. लोक कळत नकळत अश्या अफवा पसरवतात. ज्याचे आम्हाला वाईट वाटते.” त्यामुळे आमिर खानच्या घटस्फोट मागे नेमके काय कारण आहे, हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
