Share

“असंसदीय शब्द बिनदिक्कतपणे वापरणाऱ्या संपादकांची…”, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल करत जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी बोलायला हवं, असे राऊत म्हणाले. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘नॉटी म्हणजे हरामखोर, भ*वा, दलाल, चुतिया असले असंसदीय शब्द बिनदिक्कतपणे पत्रकार परिषदेत वापरणाऱ्या व त्याचे निर्लज्ज समर्थन करणाऱ्या संपादकांची आक्षेपार्ह भाषेची व्याख्या तरी काय आहे?’, असा सवालही भातखळकरांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात राजकीय मतभेद असू शकतात. मात्र जी भाषा शरद पवार यांच्याबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का?, असे राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!